Home » नाशिकमध्ये भाजपकडून पुन्हा महाजन अस्त्र

नाशिकमध्ये भाजपकडून पुन्हा महाजन अस्त्र

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जयकुमार रावल यांची नाशिकच्या प्रभारी पदावरून गच्छंती केली आहे. रावल यांच्या जागेवर माजी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकांचा सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे आता भाजपने निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून नाशिकची धुरा सांभाळणारे जयकुमार रावल यांना हटवून प्रभारी पदाची सूत्रे महाजन यांच्याकडे देण्यात आले आहेत. तर सह प्रभारीची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर नाशिक महानगरपालिका निवड समितीचे प्रमुख म्हणून गिरीश पालवे काम पाहणार आहेत.

दरम्यान नाशिकमध्ये भाजपला आज मोठे खिंडार पडल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल थांबविण्यासाठी नाशिकमध्ये पुन्हा महाजन अस्त्र वापरण्यात येणार आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!