पालकमंत्री दादा भुसे यांचा छगन भुजबळांना धक्का!

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली आहे. जिल्हा नियोजनासाठी नाशिकला 1008 कोटी रुपये मंजूर झाले असून मंजूर निधी पैकी 245 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली. तत्कालीन पालकमंत्री यांच्या काळात निधी वाटपात असमतोल होता, असे कारण देत मविआ सरकारच्या काळातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात बदल करत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना नव्या पालकमंत्र्यांनी दणका दिला आहे.


भुजबळांची अनुपस्थिती

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक झाली या आजी पालकमंत्र्यांच्या नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीला माजी पालकमंत्री छगन भुजबळांची अनुपस्थिती असल्याने चर्चांना उधान आले होते. बैठकीत भाजप-शिंदे गटाचे आमदार उपस्थित होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ, नितीन पवार यांनी देखील उपस्थित होते.

भुजबळांना दणका

नवीन पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना जोरदार दणका दिला आहे. महाविकास आघाडी सरकार काळातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात बदल करत आता निधी वाटप होणार आहे. पालकमंत्री भुसे यांनी आधीच्या निधी वाटपात असमतोल असल्याचे कारण देत, हा बदल करत नव्याने निधी वाटप करण्याचे आदेश दिले. तेव्हा काही तालुक्यात कमी खर्च तर काही तालुक्यात जास्त खर्च झाल्याचे सांगितले. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामातील निधीच सुयोग्य वाटप करण्याचा प्रयत्न करू असे देखील पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय

नाशिक मध्ये 15 ब्लॅक स्पॉट आम्ही शोधले आहेत या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना दिवाळी आधी करणार

नुकसान ग्रस्त भागासाठी 11 कोटी रुपये आलेत आहेत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत

2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळा नियोजनासाठी येत्या 3 महिन्यात कुंभमेळा आराखडा तयार करणार

शहरात पडलेले खड्डे तातडीने बुजवा अधिकाऱ्याने आदेश देण्यात आले आहेत

वणी सप्तशृंगी देवी गडावर विविध काम करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

मागे झालेल्या अतिृष्टीमुळे नुकसान भरपाई साठी स्वतंत्र निधी मिळवण्यासाठी अहवाल तयार करणार

जिल्ह्यात 100 शाळा मॉडेल स्कूल म्हणून तयार करणार

अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अनेक दिवसानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर आता दाद भुसे यांना नाशिकचे पालकत्व मिळाले. त्यांनी आता नाशिकच्या विकास कामांच्या निर्णयांचा धडाकाच लावला असून लवकरच हे निर्णय नावारूपाला येतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.