‘मनपा आयुक्तांना शासनाकडून काही मेसेज आलेत का..?’ नाशकात ठाकरे गटाचा गंभीर आरोप

नाशिक : महापालिका आयुक्त फक्त शिंदे गटाचीच कामे करत असल्याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे. या संदर्भात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका क्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. यात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याची शंका देखील ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आली आहे आणि या सर्व बाबींचे आयुक्तांना देण्यात आले आहे.

‘महापालिका आयुक्तांना शासन दरबारहून काही संदेश आले आहेत का..? अशी आमच्या मनात शंका होती. फक्त शिंदे गटाचे कामकाज करायचे आणि ठाकरे गटाला प्राधान्य देऊ नये, असे काही मेसेज शासनाकडून आले आहे का प्रथम आम्ही ती चौकशी केली. त्यावर आयुक्तांनी असे काही आदेश नसल्याचे सांगितले. सर्वसमावेशक भूमिका एक आयुक्त म्हणून ते घेणार आहे असे त्यांनी सूचित केले आहे.’ असे यावेळी ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. महापालिका आयुक्त फक्त शिंदे गटाचीच कामे करत असल्याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे.

तसेच ‘नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात जी स्वायत्त संस्था आहे. सक्षम प्राधिकरण असताना सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक झालेले आहे. त्यांचे कार्यक्षेत्र ठरलेले असताना ते कार्पोरेशन क्षेत्रात काम करायला का इच्छुक झाले, हा संशोधनाचा विषय आहे. त्यात काही आर्थिक देवाणघेवाण होत आहे का ही आमच्या मनात शंका आहे. जे लोकप्रतिनिधी पत्र देत असतील त्यांना माझी विनंती आहे की नाशिक महापालिकेची प्रतिमा मलीन होऊ नये. त्यामुळे सक्षम प्राधिकरण विभाग असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम करून घेण्याचा आग्रह का ही शंका आहे. असे काही असेल तर आमचा त्यांना विरोध आहे. तसे आम्ही आयुक्तांना सांगितले आहे.’ अशी देखील माहिती ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.

महापालिकेने अनेक योजना पूर्ण केल्या आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना सक्षम पाने पूर्ण केल्या असताना अशा प्रकारची भूमुका घेणे चुकीचे आहे. हा प्राधिकरणावर अन्याय होईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका क्षेत्रात हस्तक्षेप करू नये असे देखील ठाकरे गटाने म्हंटले आहे.