काळजाचा ठोका चुकला ! पित्याच्या डोळ्यासमोर चिमुकलीचा दुर्दैवी अंत

नाशिक : वडील कामावरून किंवा बाहेरून आले की लहान मुलांना आनंदात होतो. ते अगदी धावत पळत आपल्या वडिलांकडे जातात. वडीलही पटकन आपल्या चिमुकल्यांना कौतुकाने जवळ घेतात. मात्र अशाच प्रकारे वडील घरी येत असल्याचे पाहिल्यावर चिमुकली त्यांच्याकडे जात असताना तिच्यावर काळाने घाला घातला. नाशिक मधून ही हृदयद्रावक घटना समोर येत आहे. या घटनेत १४ महिन्यांच्या चिमुकलीने प्राण गमावले.

घडलेली घटना अशी की, घरी येत असलेल्या पित्याला पाहून चिमुकलीला आनंद झाला. आनंदात तिने वडिलांकडे धाव घेतली. दरम्यान या १४ महिन्यांच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला. ती पळत असताना अचानक रस्त्यावरून येणाऱ्या कारणे तिला जोरात धडक दिली (Accident and death of little girl in Nashik). त्यात ती गंभीर जखमी झाली. वडिलांच्या डोळ्यासमोर हा सर्व प्रकार घडला. मात्र ते काहीच करू शकले नाही. काळजाच्या तुकड्याला त्यांनी डोळ्यासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले.

चिमुकलीचे नाव आयजा खान असून मन हेलवणारी ही घटना मध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिचे वडील अमजद अखतार खान हे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी नातेवाईकांकडे आले होते. दरम्यान पैशांच्या बंदोबस्तासाठी एका खाजगी कंपनीत ते कामाला देखील जात होते. बुधवारी संध्याकाळी ते कामावरून घरी परतले. यावेळी आपल्या वडिलांना पाहून १४ महिन्यांच्या चिमुकलीने त्यांच्याकडे धाव घेतली. वडिलांना बघून तिला आनंद झाला होता मात्र हा तिचा आनंद अखेरचा ठरला. तिच्यावर काळाने झडप घातली. समोरून येणाऱ्या कारने तिला धडक दिली.

या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली. ती चाकाखाली आली. काही क्षणांत होत्याचं नव्हत झालं. आयजा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आयजा हिने जगाला निरोप दिला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वाहन चालक यांच्या विरोधात तिच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

या आधी देखील नाशिक मधून चिमुकल्यांच्या अपघाताच्या हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. त्यात या घटनेची भर पडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून लहान मुलांना क्षणोक्षणी जपणे किती महत्वाचे आहे हे स्पष्ट होत आहे.