सटाणा तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा; शेतीपिकांचे मोठे नुकसान

सटाणा – तालुक्यातील करंजाडी परिसरात आज सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लोकांचे कांदा, डाळींब पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदा काडणीचे काम चालू होत , अचानक आलेल्या पावसामुळे सर्व कांडा भिजला गेलाय.

सटाणा तालुक्यातील करंजाड, भडाणे, बिजोटे, आखतवाडे, निताणे, पारनेर, आनंदपुर, गोराणे आदि गावांमध्ये दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारा व गारपीटीने झोडपले.

वादळी वाऱ्यामुळे बिजोटेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठे नुकसान झाले असून दुकान, किशोर बच्छाव यांचे हाॅटेल वैष्णवी, घरांचे पत्रे वादळात उडाले.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले असून बहुतांश भागात कांदा उत्पादक शेतातील कांदा काढणीत व्यस्त असतांनाच वीजेचा कडकडाटात, वादळ, अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले यामुळे शेतातील संपूर्ण कांदा भिजून पडला असून रस्त्यावर गारांचा खच दिसून येत आहेत.

आखतवाडे, पारनेर, निताणे, भडाणे, या गावातही मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच शेतीशिवारात कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. शासकीय नुकसानग्रस्त भागात आमदार दिलीप बोरसे पाहणी करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच नुकसानीची तातडीने पंचनामा करण्याची ग्वाही दिली