नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी… बळीराजा सुखावला  

नाशिक शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरूण राज्याने शुक्रवारी जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पाऊस आसल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून नाशिक अहमदनगर सह राज्यभरात पाऊस नसल्याने दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतातील पीक पाण्यावाचून कोमाजून जळून गेली होती. शेकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही पाण्यावाचून पिक आली नाही काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. परंतु शुक्रवारी सकाळ पासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. नाशिक शहरातील अशोक स्तंभ परिसरात पावसाच्या पाण्याने रस्ते पाण्याखाली गेले होते.

नाशिक शहरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली नाशिक शहरात सकाळी ८:३० ते ११:३० या तीन तासांमध्ये  २५.८ मिमी पावसाची झाली नोंद आहे. नाशिक शहरला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात देखील पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण समूहात २ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली असून गंगापूर धरणात ७९ वरून ८१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

त्याबरोबर कडवा धरणामधून २१२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संतत धार सुरू आसल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून १०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आणखी २०० क्युसेस वाढ करून ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.