सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही? गिरीश महाजन

मराठा आरक्षण बैठक

नाशिक:- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हा दौऱ्यावर होते. नाशिक मधील शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षण संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक मध्ये बैठक होणार असून या बैठकीत तोडगा निघेल. माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी उपोषण सोडावे त्यांनी पाणी सोडले आहे त्यामुळे प्रकृती खराब होत आहे. त्यांचे शिस्टमंडळ आले होते त्यात चर्चा झाली होती.त्यात त्यांना तात्काळ जीआर हवा होता परंतु तात्काळ जीआर काढला तर टिकणार नाही. त्यामुळे सध्या न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
त्या समितीच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. सरसकट आरक्षण दिल्यास तांत्रिक दृष्ट्या टिकणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल त्याला काही कालावधी जाईल परंतु मनोज जरांगे पाटील हे आपल्या निर्णयावर ठाम आसल्यामुळे
उपोषण सोडणारच नाही, उगाच त्यांच्या जीवाला धोका होईल
कायम स्वरूपी मार्ग काढण्यासाठी शासनाला त्यांनी वेळ द्यावा आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

मनोज जरांगे यांची मागणी

मनोज जरांगे यांची मागणी वर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, सुरुवातीला त्यांची मागणी वेगळी होती. मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे असं त्यांनी सांगितलं होतं परंतु कुणबी समाज वेगवेगळ्या भागात आहे. मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला आहे. आता ते मागणी करताय की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा
परंतु हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी दाखला देणं हे अश्यक्य आहे, म्हणून कायद्यानुसार मराठा आरक्षण हे घ्यावे लागेल . सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही.पहिल्याच दिवशी ते फेटाळला जाईल त्यासाठी वेळ दिला पाहिजे.

सर्वपक्षीय बैठक निमंत्रण…
मराठा आरक्षणा संदर्भात तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्व छोटे मोठे विरोधी पक्ष नेत्यांच्या लोकांना बोलावलं आहे. या बैठकीसाठी उदयनराजे संभाजी राजे यांना देखील बोलावलेल आहे. सगळे समाज रस्त्यावर उतरले तर राज्याचे हिताचे होणार नाही असेही यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण
त्यांचं म्हणणं बरोबर आहे सगळेच लोक मागणी करू लागतील. पश्चिम महाराष्ट्रातील लोकही बोलतील
आम्हालाही आरक्षण हवं आहे. आरक्षण सर्वांनाच पाहिजे आहे कुणाला नको आहे त्यामुळे कॅबिनेटमध्ये निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे.

  • उद्धव ठाकरे जळगाव सभा
    उद्धव ठाकरे यांच्या जळगाव येथे झालेल्या सभेवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर सगळे लोक हसायला लागले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल ते शिलक्या भाषेत आणि खालच्या भाषेत बोलायला लागले आहे आणि यामुळे त्यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले तो विषय वेगळा आहे. ज्यावेळेस देवेंद्रजी बद्दल उद्धव ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांची मला कीव येत होती
  • फस्ट्रेशन आल्यानं ते असं बोलत आहे त्यांच्या मागे कोणी राहिलं नाही म्हणून ते सध्या अस्वस्थ आहे आम्हाला त्यांच शारीरिक व्यंग काढायचं नाही पंतप्रधानांवर त्यांनी काय बोलावं? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले आहेत
    आता विरोधी पक्षात आहे म्हणून त्यांना बोलावं लागतं पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? माणसाच्या बोलण्यात विश्वासार्हता असायला पाहिजे ?
    मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले ? हे त्यांनी बघावं .
  • उद्धव ठाकरे आरोप
    त्यांच्या मनात काही काळभेर नाही ना? त्यांना तर असं काही करायचं नाही ना अशी शंका यायला लागली संजय राऊत हे सध्या लोकांना उकवायला लागले
    आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे
    सध्याच्या काळात उद्धव ठाकरे अतिशय बालीश स्टेटमेंट करत आहे त्यामुळे त्यांनाच काही घडून तर आणायचं नाही ना?

सातारा दोन गावांतील तणाव
साताऱ्यातील पुसेसावळी गावातील दोन गटातील राड्याबदल बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात कुणाला अस्थिरता माजवायची? कुणाला दंगली घडवायच्या आहेत ?याची चौकशी झाली पाहिजेजाणीवपूर्वक अस्थिरता कोण वाजवतंय ? कोण खतपाणी घालत आहे याचीही चौकशी पोलीस करत आहे

शिवसेना आमदार सुनावणी
नियमाप्रमाणे जे आहे ते कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे चौकशी सुरू आहे.आमदार सूनवणीचा विधानसभा अध्यक्षांचा तो अधिकार आहे.

अजित पवार दावा
ही वस्तुस्थिती आहे, 2014 ते 2019 शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का ? पवार साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही काळजी करू नका आम्ही पाठीशी आहे. शिवसेना जेव्हा थोडी नाटक करायला लागली होती 2019 निवडणूक झाल्यावर त्यांनी चार चार वेळा दिल्लीत मिटींग केल्या होत्या
अजित दादा गेले आमची खेळी होती हे सांगितले, गुगली होती
ते आमच्या सोबत होते, त्यांचा मानस होता परंतु त्यांनी आम्हाला गाफील ठेऊन खरी गुगली टाकली.
घात करायचा ही त्यांची परंपरा आहे

  • अजित पवार म्हणताय ते 100 टक्के खरं 2014 साली त्यांनीच उघड पाठिंबा दिलात्यांनी सांगितलं म्हणून तर आम्ही दावा केला होता. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे . दिल्लीत जाऊन किती वेळा बैठका झाल्या. आमच्या नेत्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाच्या पालकमंत्री पदाच्या वाटाघाटी केल्या आता काय ते नाही म्हणता अजित पवार म्हणताय ते खरं आहे. अजितपवार देखील त्या बैठकीला उपस्थित होते हे शरद पवार नाकारू शकत नाही. असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले.