अखेर प्रतिक्षा संपली..! दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाची बातमी..

By चैतन्य गायकवाड |

पुणे : दहावीच्या निकालाबाबत (10th result) पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील उत्सुकता ताणलेली असतानाच, आता त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. कारण आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री (Education Minister) प्रा. वर्षा गायकवाड (Pro. Varsha Gaikwad) यांनी ट्विट (tweet) करून निकालाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी स्वतः दहावीच्या निकालाबाबत एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (SSC) (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या (दि. १७ जून रोजी) दु. १:०० वाजता ऑनलाईन (online) जाहीर होणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे ट्विट

दरम्यान, गेल्या आठवड्यात दि. ८ जून रोजी बारावीचा निकाल (HSC result) जाहीर झाला होता. त्यामुळे दहावीचा (SSC) निकाल कधी लागणार, याकडे पालक तसेच विद्यार्थ्यांचेदेखील लक्ष लागून होते. तसेच ज्याप्रमाणे बारावीच्या निकालाबाबत समाजमाध्यमांवर विविध तारखांचे अंदाज बांधले जात होते, त्यामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता दहावीच्या निकालाबाबत स्वतः शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी माहिती दिल्याने, पालक तसेच विद्यार्थी यांच्या मनातला संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थ्यांना उद्या दुपारी १ वाजेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर (website) दहावीचा निकाल बघायला मिळणार आहे.

या वेबसाईटवर बघा निकाल… विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in यावर भेट द्यावी. तिथे ‘इयत्ता १० वी निकाल २०२२’ (SSC result 2022) यावर क्लिक करावे. समोर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे विद्यार्थ्यांनी सीट नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा. १० वीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.