बागलाण तालुक्यातील धक्कादायक प्रकार जन्मदात्या बापानेच केला मुलाचा खून

नाशिक: बागलाण तालुक्यातील धक्कादायक प्रकार जन्मदात्या बापानेच केला मुलाचा खून. दारूच्या नशेत जन्मदात्या बापाने मुलाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून त्याचा खून केल्याची धक्कादायक प्रकार (आनंदपूर, ता. बागलाण) येथे घडला आहे.

याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बापास पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. राजेंद्र चव्हाण असे मृताचे नाव आहे. आनंदपूर येथील देवपूर पाड्यावर साहेबराव चव्हाण हे पत्नी व मुलगा राजेंद्र यांच्यासह राहतात.

साहेबराव त्यांचा मुलगा यांच्यात नेहमी छोट्यामोठ्या गोष्टीवरून भांडणे होत असतात. बुधवारी (ता.५) जिजाबाई चव्हाण (पत्नी) व नणंद लीलाबाई चव्हाण (नणंद) या सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेले असता साहेबराव चव्हाण व मुलगा राजेंद्र चव्हाण (वय ३१) हे दोघे घरीच होते. गुरुवारी (ता.६) बाप-मुलामध्ये वाद झाला. वादाचे परिणाम हाणामारीत झाले.

जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी जायखेडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे