नाशिकमध्ये ‘हर घर तिरंगा’ महापालिकेने मागवले ‘इतके’ लाख झेंडे

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाले असून सर्व भारतीय या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी साजरा करतो आहोत. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी केंद सरकारकडून अनेक उपक्रम राबविले जात असून त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ‘हर घर तिरंगा’ , या उपक्रमा अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या संपूर्ण ६ विभागीय कार्यालयातून २ लाख तिरंगा ध्वजांची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये केंद्र सरकार चा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ जल्लोषात साजरा केला जाणार आहे. शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी महापालिकेकडून पूर्ण नियोजन केले जात आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तसेच देशभक्ती तेवत रहावी आणि या लढ्यातील क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे. यादृष्टीने अमृत महोत्सवांतर्गत ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रम राबविण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव नाशिकमध्ये ‘हर घर तिरंगा’ महापालिकेने मागवले ‘इतके’ लाख झेंडे वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नाशिक विभागातील शहरी व ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या ३८ लाख ५१ हजार ६५१ इतकी असून, या प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून त्याचे नियोजन केले जात आहे. या नियोजनाच्या अनुषंगाने मनपाने दोन लाख तिरंगा ध्वजाची मागणी नोंदविली होती. येत्या दोन दिवसांत महापालिकेकडे अहमदाबाद येथून ध्वज प्राप्त होणार आहेत. तिरंगा ध्वज नागरिकांना उपलब्ध व्हावे यासाठी मनपाने आपल्या सिडको , सातपूर , नाशिक पूर्व , नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिकरोड या सहाही विभागीय कार्यालयांत विक्री केंद्राची व्यवस्था केली आहे . ३० इंच रुंद आणि २० इंच लांबी असलेल्या ध्वजाकरिता नागरिकांडकून २१ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.