नाशकात शेतकऱ्याने बांधावर लावली गांजाची झाडे; पोलिसांनी कशी केली धडक कारवाई पहा

नाशकात एक खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळली. हा गांजा तब्बल ५० किलो असून पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील घोडेवाडी शिवारात हा खळबळजनक प्रकार घडला असून शेतावरील बांधावर गांजाची झाडे लागवड केली होती. घोटी पोलिसांनी कारवाई करत शेतकऱ्याला अटक व हा ५० किलो गांजा जप्त केला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील घोडेवाडी शेत शिवारात गांजा असल्याची माहिती घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह पोलिसांना मिळाली. घोटी पोलिसांनी माहितीची खात्री घोडेवाडी शिवारातील शेतकरी चिमा घोडे यांच्या शेतावर छापा टाकत धडक कारवाई केली. शेतावरील बांधावर लागवड केलेल्या जवळपास ७० ते ८० झाडे होती. व यांची उंची ५ ते ६ फूट असून ही गांजाची झाडे जप्त केली आहेत. या झाडांचे वजन केले असता अंदाजे ५० कीलो वजनाचा गांजा हा होता. तसेच शेतकरी चिमाजी घोडे
(५०) यांस घोटी पोलिसांनी अटक करून पंचनाम्यासह गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


पैश्याची लालसा खावी लागते जेलची हवा

शेतात असे अमलीपदार्थ पदार्थांची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र काही शेतकरी पैश्यांच्या लालसेने अश्या अमलीपदार्थांची लागवड करतात, मात्र नंतर त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. शेतकरी चिमाजी घोडे (५०) यांस घोटी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोषी ठरल्यास जवळपास १० ते १२ वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते.