अखेर रामसेतू पूल बंद, प्रशासनाच निर्णय, का घेतला निर्णय?

नाशिक; शहरात गेल्या आठवडा भरापासून मुसळधार पाऊस ठाण मांडून बसलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला प्रचंड मोठा पूर आलेला आहे. नदी दुथड्या भरून वाहते आहे. अश्यातच नाशिकच्या गोदाघाटेवर असलेला रामसेतू पूल हा प्रशासनाकडून रहदारीसाठी व पादचाऱ्यासाठी बंद करण्यात आलेला आहे. हा पूल नाशिकच्या रामकुंडावर स्थित आहे. या पुलाची स्थिती बिकट होती. हा पूल अति जुना असल्याने हा ठिकठिकाणी जीर्ण अवस्थेत होता. तसेच हंगामातील पहिला पूर आला होता तर या पुलावरून पाणी वाहत होते. आणि त्याने पूलाल जागोजागी तडे पडले होते. आता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल रहदारीसाठी व पादचाऱ्यासाठी बंद करण्यात आलेला आहे.

सोमवारी गोदावरी नदीला मोठा पूर आला होता, त्यात नाशिकचे पारंपारिक पूर मापक असलेला दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचले होते. तसेच रामसेतू पुलावरूनही पाणी गेले होते. पुराचा प्रवाह जास्त असल्याने अनेक वास्तुना छोटे मोठे तडे गेले आहेत. अश्यातच रामसेतू पुलालाही मोठे मोठे तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. तरीही पुलावर कालपर्यंत रहदारी सुरूच होती यावर प्रशासन काहीच कसे पूल उचलत नाही असे प्रकारच्या बातम्या ‘नाशिक तक’ ने प्रकाशित केल्या होत्या. आज तातडीने निर्णय घेत नाशिक प्रशासनाने पुलावर बेरीकेड्स लावत रहदारी व पादचाऱ्यासाठी हा पूल बंद केला आहे.

पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी पावसाची संततधार ही सुरूच आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग मोठ्याप्रमाणावर सुरूच आहे. गोदाघाट संपूर्ण पाण्याखाली लपलेला आहे. हे दृश्य बघण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. लोकांचा वावर राम सेतू पुलावरही प्रचंड आहे हेचं लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून राम सेतू पूल बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून संपूर्ण पुलाची पाहणी देखील करण्यात आलेली आहे.

नागरिकांनीही प्रशासनाच्या आदेशाचे पालान करावे. पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे गोदावरी नदीचा पूर कधी सरेल याची शाश्वती नाही त्यामुळे काळजी घ्या गरज असेल तरच बाहेर पडा.