T20 विश्वचषकात ‘या’ भारतीय खेळाडूने जिंकलं पाकिस्तानी अँकरचे मन

T20 world cup 2022 : पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकात अपयशी ठरतोय. मात्र त्यांच्या एका अँकरची या क्रिकेट विश्वचषकात चांगलीच चर्चा होत आहे. ही अँकर ऑस्ट्रेलियात यशाचे झेंडे रोवत आहे.

प्रतिभेसोबत तिच्या सौंदर्याचीही चर्चा

जैनब अब्बास असं या पाकिस्तानी अँकरच नाव आहे. जैनब पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. अँकरिंग बरोबरच जैनब तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा चर्चेत असते. जैनब अब्बास सध्या टी २० वर्ल्ड कप २०२२ कव्हर करतेय. याच दरम्यान तिने भारतीय मॅच विनर्ससोबतही चर्चा केली आणि याचवेळी तिने सूर्यकुमार यादव सह करत असलेल्या चर्चेचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

जैनबने पोस्टमध्ये काय म्हटलय?

सूर्यकुमारच्या त्या इनिंगने जैनबच मन जिंकलं. जैनबने तिच्या इन्स्टाग्रामवर सूर्यकुमार सोबतच्या मुलाखतीचा फोटो पोस्ट केलाय. क्रिकेट विश्वातील नंबर १ टी २० फलंदाज सूर्यकुमार यादव बरोबर उत्तम चर्चा असं जैनबने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे (Fabulous chat with suryakumar Yadav on becoming the number one T20 batsman in the world and just on his unbelievable innings at Perth.).

जैनब अब्बास..

पाकिस्तानची क्रीडा पत्रकार जैनब अब्बास चांगलीच लोकप्रिय झाली आहे. जैनब अब्बासची जगभरात ओळख होत आहे. जैनब अब्बासने तिच्या अनोख्या शैलीमुळे आणि क्रिकेटला फॉलो करण्याची आवड यामुळे जगभरात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. क्रिकेट फक्त पुरुषच खेळू शकतात आणि समजू शकतात असा समज आहे. मात्र जैनब अब्बासने या बाजूचे सर्व भ्रम धुडकावून लावले आहेत. त्यामुळे जैनब अब्बासच्या कौशल्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. एवढेच नाही तर आयसीसीनेही त्याच्या क्षमतेचे कौतुक केले. अशा परिस्थितीत आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाच्या यादीत जैनब अब्बासचाही समावेश केला आहे.