डिजेचा तीव्र आवाज दोघांच्या जिवावर बेतला सांगलीतील घटना

सांगली:- गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे, बँजो ढोल तशा यांचा आवाज सहन न झाल्याने दोन तरुणांची मृत्यू झाल्याची घटना सांगलीत तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात घडली आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना डीजे चा तीव्र आवाज सहन न झाल्यामुळे शेखर सुखदेव पावसे (वय ३०) हा तरुण नाचत असताना हृदयविकाराचा(HEART ATTACK) तीव्र झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.(SANGALI)

यामुळे कवठेएकंद गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर डीजेच्या तीव्र आवाजाने अस्वस्थ झालेल्या प्रवीण शिरतोडे याला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतच चक्कर आली. मित्रांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली. या दोन्ही घटनांमुळे न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबल पेक्षा अधिक आवाजाने स्पीकर वाजवू नये असे आव्हान प्रशासनाने केले आहे. तर डीजे ढोल वाद्यांचा आवाज 35 डेसिबलच्या आत ठेवूनच गणरायाला निरोप द्यावा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डीजेच्या दणदणाटाने हृदयविकाराचा धक्का बसलेल्या शेखर पावसेची दहा दिवसांपूर्वीच एन्जोप्लास्टी झाल्याचे समोर आले आहे.

त्याला हृदयरोगाचे निदान झाले होते. असे असतानाही तो गणेश विसर्जन मिरवणुकीला गेला यावेळी डीजेचा आवाज सुरू होता. मिरवणुकीत नाचणाऱ्या शेखरला नंतर अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी परतला मात्र घरात येतात भोवळ येऊन तो खाली पडला छातीत असाह्य वेदना होऊ लागल्याने त्याला तासगाव येथील खाजगी रुग्णालयात नेले परंतु उपचारापूर्वीच शेखरचा मृत्यू झाला होता. वळवा येथील विसर्जन मिरवणुकीत चक्कर येऊन कोसळलेल्या प्रवीण शिरतोडे याचा सेंट्रींग व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी तो कामावरून घरी पोहोचला त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत गेला काही वेळातच डीजेच्या आवाजाने त्याला अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसोबत नाचत असताना चक्कर येऊन खाली पडला त्यावर त्वरित खाजगी रुग्णालयाने परंतु डॉक्टरांनी त्याला मृत(PATIENT DEATH) घोषित केले

गणेश भक्त गणरायाला निरोप देण्यासाठी डीजे, बँजो, ढोल वाजवतात. परंतु या आवाजाने नागरिकांंच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. ३५ डेसिबलच्या पुढील आवाजाने हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे चक्कर येण्यास सुरुवात होते. ११५ डेसिबल(DECIBLE) आवाजाने बहिरेपणा आणि १३५ डेसिबलच्या आवाजाने कानाचा पडदा फाटू शकतो, असे तज्ज्ञ डॅाक्टरांनी सांगितले. त्यामुळे डीजे, बँजो आणि ढोलचा आवाज ३५ डेसिबलच्या आत ठेवून जल्लोषात गणरायाला निरोप द्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.