इंग्लंड नंतर भारताचा वेस्टइंडीज दौरा ‘या’ दोन खेळाडूंना दिली विश्रांती

भारत विरुद्ध इंग्लंड दौरा चालू असून आता आता भारत वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच बीसीसीआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे .याच महिन्यापासून हा भारताचा वेस्टइंडीज दौरा सुरू होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील टी 20 सामन्यांसाठीच नेतृत्व रोहित शर्मा करणार असून विराट कोहली आणि आघाडीचा गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह यांना या सामान्य दरम्यान विश्रांती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जागेवर के. एल. राहुल आणि कुलदीप यादव यांना संघात संधी देण्यात आली आहे. के.एल.राहुल आणि कुलदीप यादव यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. असे असले तरी त्यांच्या फिटनेस वर ते अंतिम 11 मध्ये असणार आहेत.

सध्या भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर कसोटी टी ट्वेंटी आणि एक दिवसीय मालिका खेळल्यानंतर आता वेस्टइंडीज बरोबर अगोदर तीन एक दिवसीय सामने तर पाच टी – 20 चे आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेतील अखेरचे दोन टी-20 सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळले जाणार आहेत. हे टी – 20 चे सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता चालू होणार आहेत. भारताचा इंग्लंड दौरा 17 जुलैला संपणार आहे. त्या दौऱ्यात सहभागी खेळाडूंमधून निवड केलेले खेळाडू थेट इंग्लंडहून वेस्ट इंडिजला रवाना होणार आहेत.

वेस्टइंडीज दौऱ्यावर असा असेल टी – 20 भारतीय संघ –
रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, डी हुड्डा, एस अय्यर, डी कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, आर बिश्नोई, कुलदीप यादव, भूवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग