जिंदाल अग्नितांडव प्रकरणी चौकशी पूर्ण ; ७ जणांवर गुन्हा दाखल

नाशिक : जिल्ह्यातील घोटी तालुक्यात जिंदाल कंपनीमध्ये १ जानेवारीला भीषण आग लागली होती. ही घटना घडून दीड महिना उलटल्यानंतर याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यात भोगवटा दारासह कंपनीच्या मॅनेजरचा समावेश आहे. चौकशी केल्यानंतर जिंदालच्या सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिंदाल कंपनीमध्ये भीषण अग्नी तांडव (Jindal Company fire case) झाला होता. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर २२ कामगार जखमी झाले होते. या प्रकरणी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग नाशिक आणि संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून अहवाल मागविण्यात आला. सेफ्टी ऑडिट रिपोर्ट आणि इतर कागदपत्र ही प्राप्त करण्यात आली. त्यानंतर ज्या ठिकाणी ज्या बॅच पोली प्लांटमध्ये आग लागली होती, तो आधी दीड महिन्यापासून बंद होता. हा प्लांट सुरू करण्यापूर्वी तपासणी आणि दुरुस्ती होऊन तो सुरू करताना एसओपीचे पालन न केल्याने प्लांटमधून धर्मिक फ्लिड ऑइल गळती झाली आणि त्यातून आग लागल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सात जणांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटी (Nashik, Ghoti..Jindal Factory Fire) तालुक्यातील मुंढेगाव परिसरात (Mundhegav Area) नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग विझवायला वीस तास लागले. तब्बल २० तास जिंदाल कंपनीत अग्नी तांडव पहिला. २० तासानंतर आग आटोक्यात आली मात्र तरीही पूर्णपणे विझली नव्हती. परिसरात धूर पसरला होता. तर दूरपर्यंत आगीच्या लोळच्या लोळ उठलेले दिसत होते.

या घटनेने नाशिकसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. ऐन नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये ही भयानक घटना घडली होती. भीषण आगीत स्फोटही झाले होते. मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः याची पाहणी केली होती आणि चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर नुकतीच चौकशी पूर्ण झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister Eknath Shinde) आदेशावरून चौकशी करण्यात आली. या प्रकरणी ७ जणांना जबाबदार धरत त्यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.