IPL 2023 Punjab Kings: पंजाब किंग्ज संघात मोठा बदल, हा खेळाडू IPL 2023 मधून बाहेर

IPL 2023 Punjab Kings: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघात बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त राज अंगद बावा (Raj Angad Bawa) च्या जागी अनकॅप्ड गुरनूर सिंग ब्रारचा संघात समावेश करण्यात आला आहे. पंजाबने गुरनूर सिंग (Gurnoor Sing Brar)  ला 20 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केले आहे.

IPL 2023 Punjab Kings: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघात बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त राज अंगद बावाच्या जागी अनकॅप्ड गुरनूर सिंग ब्रारचा संघात समावेश करण्यात आला आहे. पंजाबने गुरनूर सिंगला 20 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केले आहे.

हेही वाचा: सोन्याच्या दराने नवा विक्रम केला, भावाने गाठली 61,000 रुपये, चांदीनेही गाठला नवा उच्चांक

गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून दोन सामने खेळणारा बावा डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे सध्याच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. ब्रार हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या 22 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 107 धावा केल्या आहेत आणि सात विकेट्सही घेतल्या आहेत.

गुरनूर हा अष्टपैलू खेळाडू आहे

गुरनूर हा डावखुरा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने डिसेंबर २०२२ मध्ये पंजाबसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 120.22 च्या स्ट्राइक रेटने 107 धावा केल्या आहेत आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पंजाब किंग्जने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पंजाबने पहिल्या सामन्यात केकेआरचा ७ धावांनी पराभव केला होता. पंजाब आणि केकेआर यांच्यातील सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता.