महिलेच संतुलन बिघडलं अन तिने आपल्याच जावेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली!

औरंगाबाद येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मनोरुग्ण महिलेने आपल्याच जावेच्या डोक्यात कुऱ्हाड घालत तिची निर्दयीपणे हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलेच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिता संतोष लांडे (वय 47 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील माहुली शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. अनिता संतोष लांडे व मनिषा काकासाहेब लांडे या दोघी सख्ख्या जावा आहेत. यात अनिता ही अपंग होती आणि मनीषा ही मनोरुग्ण होती. तिच्यावर उपचार देखील सुरु असल्याची माहिती पोलिसांना कुटुंबीयांनी दिली आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. १३) रात्री मनिषाचे अचानकच हातात धारदार कुऱ्हाड घेऊन थोरल्या जाऊ अनिता संतोष लांडे यांच्या डोक्यात घाव घातला, यात अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. स्वत: वरील संतुलन सुटल्याने मनीषाने हे कृत्य केले. यात अनिता गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तीला मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.