पंचवटीतील हिरावाडीत युवकावर प्राणघातक हल्ला, संशयित फरार

नाशिक । प्रतिनिधी

हिरावाडी परिसरात रविवारी (दि.०६) रोजी रात्री नऊच्या सुमारास दोघा संशयितांनी आणि एका युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची गंभीर घटना घडली.

पंचवटी परिसरातील हिरावाडी जवळील पाटालगत ही घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दखल करण्यात आले आहे.

येथील परिसरातील रविवारी सायंकाळी दोन संशयितांनी एका युवकावर धारदार शस्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. त्या दोघा युवकांनी त्या युवकास जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

दरम्यान पोलिसांनी तातडीने या युवकास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेतील जखमी व मारेकऱ्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाही. संशय गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून हिरावाडी परिसरात टवाळखोरांचा वावर वाढल्याने पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.