Video : उसतोडी दरम्यान आढळले बिबट्याचे पिल्लू; कामगार सैरभैर

नाशिक । प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील गोराणे येथील शेतात उसतोड सुरू असतानाच बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी ऊसतोड कामगारांची चांगलीच धावपळ झाली.

बागलाण तालुक्यातील गोराणे येथील मधुकर पंडित देसले यांच्या शेतात उसतोड होती. यावेळी ऊसतोड सुरू असतानाच कामगारांना बिबट्याचे मादी पिल्लू आढळून आले. यामुळे कामगारांची एकच धांदल उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वनकर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याच्या पिलाला ताब्यात घेतले आहे. उसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळून येताच उसतोड कामगार सैरभैर झाले होते.

दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याच्या पिलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत गावात माहीती मिळताच बघ्यांची गर्दी उसळली. वनकर्मचाऱ्यांनी पिलाला ताब्यात घेऊन एका प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवले. शेतात सुरू असलेली उसतोड थांबण्यात आली असून सायंकाळी पुन्हा त्याच ठिकाणी कॅमेरे लावून पिलाला पुन्हा आईच्या स्वाधिन करणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र आधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली.