नाशिक जिल्ह्यात पुढील 5 हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून ते बुधवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे आकलन करण्यात आला आहे.

पुढील ५ दिवस हवामान ढगाळ राहणार असून तापमान कमाल २५ ते २६, तर किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग तासी १९ ते २१ किलोमीटर असा राहील. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Read Also: नाशिक मध्ये वादग्रस्त रिल्स करणाऱ्या एका युवकाला अटक

इगतपुरी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला हा सल्ला

पुढील ५ दिवसाच्या पावसाचा अंदाज घेऊनच कांदा, भात, नागली, वरई किंव्हा दुसरे कुठल्याही पिकाची या पुनर्लागवड केलेल्या पिकांच्या क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात कसे साठवता येईल या साठी उपाययोजना करा.

Read Also: नाशिकमधील धक्कादायक घटना नववीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार