लखनौहून रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

Lucknow-Rameswaram Train Fire: मदुराई स्टेशनजवळ उभ्या असलेल्या पर्यटक ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनमधील काही प्रवासी डब्यात चहा बनवू लागले तेव्हा शनिवारी पहाटे 5 वाजता एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. येथील पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. लखनौ-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. आठही बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागलेल्या डब्यात एकूण 55 प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.

Read Also: नाशिक जिल्ह्यात पुढील 5 हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

आग कशी लागली

दारायल मदुराई स्टेशनवर पर्यटक ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनच्या काही प्रवाशांनी डब्यात चहा बनवायला सुरुवात केली. त्यानंतर एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.

मृतांचा आकडा वाढू शकतो

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. प्राथमिक अहवालानुसार 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले रेल्वे अधिकारी?

तामिळनाडूमध्ये रेल्वेला लागलेल्या आगीच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले, अशी माहिती दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी. गुगनेसन यांनी दिली. प्रवाशांच्या डब्यात गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आग लागली.