ज्ञानवापी मशिदीसंदर्भात मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे प्रकरण..!

ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी मंदिर प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला आहे. हिंदू पक्षकारांची मागणी मान्य करत न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीस योग्य मानले आहे. या प्रकरणावर २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याचवेळी हिंदू बाजूने निर्णय आल्यानंतर आणि मुस्लीम पक्षकारांची मागणी फेटाळून लावल्यानंतर आता मुस्लिम बाजू उच्च न्यायालयात जाऊ शकते. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निर्णय दिला आहे. शृंगार गौरी मंदिरात पूजेची परवानगी मागणारी याचिका त्यांनी सुनावणीस योग्य मानली आहे. त्यामुळे आता २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

ज्ञानवापी मशीद वाद

खरं तर, १९९१ मध्ये स्थानिक पुजाऱ्यांनी वाराणसी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापी मशीद परिसरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी म्हटले की १६व्या शतकात औरंगजेबाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून तेथे मशीद बांधण्यात आली. खरं तर काशी विश्वनाथ मंदिर माळवा राजघराण्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. औरंगजेबच्या आदेशानुसार मंदिराचा काही भाग पाडून तेथे मशीद बांधण्यात आली असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. मशिदीच्या आवारात हिंदू देवतांच्या मूर्ती असून त्यांना ज्ञानवापी मशिदीच्या आवारात पूजा करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. हा मुद्दा १९९१ पासून वेळोवेळी उपस्थित केला जात आहे.

ज्ञानवापी मशीद आणि इतिहासकारांचे मत

सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे काशीची ज्ञानवापी मशीद. इथं असा दावा केला जातो की ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर एकेकाळी मंदिर होतं.
ब्रिटीश लायब्ररीत एक माहिती दिली आहे. त्याप्रमाणे विश्वनाथ मंदिराच्या चित्रासह असलेल्या या माहितीमध्ये हे मंदिर १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबने पाडलं होतं. इतिहासकार सांगतात, काशी आणि मथुरेचे मंदिर औरंगजेबाने उद्ध्वस्त केले होते. ते त्याच्या आदेशाने तोडण्यात आले. एकीकडे तो मंदिर उद्ध्वस्त करत होता, तर दुसरीकडे, तो मंदिरे आणि मठांना दान, जमीन आणि पैसा देत होता. तर काही इतिहासकार हिंदू संघटनांचा दावा पूर्णपणे नाकारतात. त्यांच्या मते मुघल सम्राट अंबरनाथ आपल्या दीन-ए-इलाही धार्मिक व्यवस्थेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी येथे ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिर एकत्र बांधले होते.