नाशिक शहरात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळी चा पर्दापाश.

नाशिक:- गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच(nashik city crime) प्रमाण वाढतच आहे. नाशिक शहरातील चोरी गेलेल्या पाच मोटरसायकल हस्तगत करून सहा विधी संघर्ष बालकांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नाशिक शहरातील आडगाव पोलीस स्टेशन(nashik city police) हद्दीतील चोरी गेलेल्या मोटरसायकल हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायहदे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेट्रोलिंग करत असताना.

चार इसम मेडिकल चौफुली जवळ चोरी केलेल्या दोन मोटरसायकल विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आडगाव पोलिसांनी शिताफीने संशियीत एका इसमाला ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांनी सखोल तपास करत असताना पंचवटी(nashik panchvati ) हद्दीतील मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा त्याने कबूल केला.

या गुन्हयात सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल असा एकूण १०५००० रुपये किमतीच्या पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे.या घटनेचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहे.

नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसापासून गुन्हेगारी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नाशिक शहराची ओळख ही ‘गुन्हेगारीचे शहर’ म्हणून होण्यास वेळ लागणार नाही. मागील महिन्यापूर्वी नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आला घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

या पार्श्वभूमीवर त्यांनी मोटारसायकल चोरी प्रतिबंध पथकही निर्माण केले होते . तरीही मोटारसायकल चोरीच्या गुन्हेगारांना आला बसत नाही. सततच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.