वाढत्या गुन्हेगारीवर तत्काळ उपाययोजना करण्याची मनसेची मागणी…

नाशिक | नाशिक शहर (Nashik city) पोलिस आयुक्तालय हद्दीत गेल्या १५ दिवसांत तब्बल ०७ खून (murder), घरफोड्या, खंडणी, दुचाकी चोरी, चैन स्नेचिंग (chain snaching), लुटमार, विनयभंग अश्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळे नागरिक, व्यावसायिक व महिला वर्गात प्रचंड दहशत पसरली आहे. या गुन्हेगारी घटनांवर तत्काळ अंकुश लावण्यात यावा तसेच कायद्याचा वचक बसवावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. याप्रकरणी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांना मनसेकडून (MNS) निवेदन देण्यात आले.

आडगाव पोलीस ठाणे हद्दीत स्वयंपाक येत नसल्याने आरती देवरे (Arati Devre) या महिलेची सासरच्यांकडून फावड्याने ठेचून हत्या, म्हसरूळ येथील यश गांगुर्डे (Yash Gangurde) या युवकाची मित्रांच्या भांडणात चॉपरने हत्या, जगदीश जाधव (Jagdish Jadhav) नामक वडिलांनी आपल्या हट्टी व शिवीगाळ करणाऱ्या प्रणव जाधव (Pranav Jadhav) ह्या मुलाचा केलेला खून, आनंदवल्ली शिवारात व्यसनी मित्रांच्या जबरी मारहाणीत प्रथमेश खैरे (Prathamesh Khaire) या विद्यार्थ्याचा मृत्यू, पुण्याहून आई-वडिलांना भेटण्यास आलेले हरीश पाटील (Harish Patil) यांचा द्वारका येथे मद्यपी टोळक्याकडून भल्या पहाटे खून, भारतनगर येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या सागर रावतर (Sagar Ravtar) या तरुणाचा चाकू भोसकून खून, जत्रा हॉटेल जवळील अंडारोलच्या गाडीवर झालेल्या भांडणातून अजिंक्य लभडे (Ajinkya Labhade) या युवकास विक्रेता व त्याच्या साथीदारांनी डोक्यात दगड टाकून केलेला जीवे मारण्याचा प्रयत्न, पाईपलाईन रोड येथे दगडाने ठेचून युवकाचा झालेला खून, अश्या खुनांच्या मालिकेमुळे संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे.


गुन्ह्यांची आकडेवारी बघता बहुतांशी आरोपी हे १८ ते २५ या वयोगटातील (age group) आहे. अनेक गंभीर गुन्ह्यातील बाल गुन्हेगारांना (विधी संरक्षित) काही काळ रिमांडहोममध्ये देखरेखीखाली ठेवून सोडून देण्यात येते. त्यामुळे ह्या गुन्हेगारांची कायद्याची भीती निघून जाऊन ह्यापैकीच अनेकजण पुढे जाऊन अट्टल गुन्हेगार बनतात. याबाबत पोलीस यंत्रणा कुठे कमी पडते याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करायला हवी. सक्षमपणे गुन्हे मांडून गुन्हेगारांना शासन केल्यासच पोलीस यंत्रणेचा वचक वाढेल.

गुन्हेगारी रोखण्यासाठी बीट मार्शलची नियमित गस्त सुरु करावी. महिला पोलिसांची गस्त वाढवून चौका-चौकात बसणाऱ्या टवाळखोर युवकांचा बंदोबस्त करावा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची ओळख करून कायद्याचा वचक बसवावा अश्या मागण्या मनसेकडून करण्यात आल्या. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांनी याबाबत तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी नगरसेवक सलीम शेख, शहर समन्वयक सचिन भोसले, माजी नगरसेवक योगेश शेवरे, उपशहराध्यक्ष संतोष कोरडे, विजय आहिरे, अक्षय खांडरे, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, नितीन साळवे, विक्रम कदम, नितीन माळी, योगेश लभडे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, मनविसे शहराध्यक्ष ललित वाघ आदि पदाधिकारी उपस्थित होते.