नाशिक ढोल पथकांच्या वादकांना देशभरातून मागणी?

नाशिक: ढोल पथकांमधील वादक ते वाजवत असलेली धून नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यासाठी ढोल पथके सज्ज झाली असून नाशिक ढोल पथकांचा निनाद देशभरात गुंजणार आहे.

नाशिक ढोल पथकांच्या वादकांना देशभरातून मागणी आहे.

नाशिकच्या ढोल पथकांना देशभरातून मागणी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पथक प्रमुखांकडे गुजरात, हैदराबाद, मध्यप्रदेश, बिहार येथील मंडळांनी वादनासाठी विचारणा केलेली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील शहरांमधूनही नाशिक ढोल पथकांना मागणी आहे. नाशिक शहरात जवळपास ३० पेक्षा जास्त ढोल पथके आहेत.

त्यामुळे जवळपास ७,००० जास्त ढोल वादक सज्ज झाले आहेत. गणपती बाप्पाचे आगमण व विसर्जनासाठी पथकांकडून बुकींगला चांगला प्रतिसाद मिळत असून काही पथकांचे बुकींग फुल्ल झाले आहे.

बुकिंग च्या वेळेस मंडळाने केलेल्या सहकार्यानुसार त्यांनी केलेल्या मागणीनुसार वादकांची संख्या ठरते. मागणीनुसार पथकांनी बुकींग केली जाते. वादकांच्या दिमतीला पथकांमध्ये स्वयंसेवकही दिमतीला असतात, त्यामुळे त्या प्रकारे ढोल वादकांचे नियोजन सुरू आहे.

गणपती बाप्पाच्या मंडळांसाठी बसविला वेगळा ताल

नाशिक ढोलचा निनाद (आवाज) देशभर गुंजतोय, गणेशोत्सवात लाखो भक्त नाशिकला येऊन नाशिक ढोलवर नृत्य करताना दिसतात. आता नाशिकच्या ढोल पथकांकडून मंडळांसाठी आगमन आणि विसर्जनासाठी वेगळा ताल बसविला आहे, त्यामुळे ढोल पथकांचे वेगळेपण नाशिककरांना अनुभवायला मिळणार असून विविध नव्या तालांवर नाशिकची तरुणाई थिरकणार आहे.