नाशिक पदवीधर निवडणूक; सस्पेन्स कायम..!

नाशिक : पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसंदर्भात आतापर्यंत भाजप आणि कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराबद्दल मोठा सस्पेंस निर्माण झाला होता. दरम्यान कॉंग्रेस ने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली असून आज सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिकच्या विभागीय कार्यालयात एकाच गाडीतून दाखल झाले. मात्र भाजपकडून अद्यापही सस्पेन्स कायम असून धनराज विसपुते यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

भाजप कोअर कमिटी पदाधिकारी देखील विभागीय कार्यालयात दाखल झाले. ए. बी (AB) फॉर्म घेऊन भाजप पदाधिकारी दाखल झाले खरे..यावेळी संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस विजय चौधरी देखील दाखल झाले. मात्र हा ए.बी (AB) फॉर्म नेमका कोणाला याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान धनराज विस्पुतेंच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.

नाशिकच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत या वेळी उमेदवारांबाबत चांगलीच उत्सुकता ताणली गेली होती. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याने सस्पेंस निर्माण झाला होता. भाजपकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु होती. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून शेवटच्या क्षणापर्यंत हा सस्पेन्स टिकून राहणार का ? हा प्रश्न होता आणि झालेही नेमके तसेच भाजप कोअर कमिटी पदाधिकारी विभागीय कार्यालयात दाखल झाले. ए. बी (AB) फॉर्म घेऊन भाजप पदाधिकारी दाखल झाले. यावेळी संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस विजय चौधरी देखील दाखल झाले. मात्र हा अर्ज नेमका कोणाला याबाबत आणखीच सस्पेन्स वाढला.

नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारी अर्ज भरण्यास काही तासांचा वेळ आहे. भारतीय जनता पक्षाकडून अद्यापही या मतदारसंघातला उमेदवार कोण हे जाहीर करण्यात आलेलं नाही. काँग्रेसकडून सुधीर तांबे तर भाजपकडून राजेंद्र विखे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असताना आज कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिकच्या विभागीय कार्यालयात एकाच गाडीतून दाखलही झाले. मात्र भाजपचा उमेदवार कोण यावर प्रश्न चिन्ह कायम आहे. उमेदवारीबद्दल भाजपकडून ट्वीस्ट अँड टर्न कायम आहे.

धनंजय जाधव हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यासोबतच नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी धुळ्याचे धनराज विसपुते हे देखील इच्छुक उमेदवार आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडून अद्यापही या मतदारसंघातला उमेदवार कोण हे जाहीर करण्यात आलेलं नाही. काँग्रेसचे नेते डॉक्टर सुधीर तांबे हे काँग्रेसकडून अर्ज भरत आहे. मात्र भाजपकडून सस्पेन्स कायम आहे. चर्चेप्रमाणे धनराज विसपुते या निवडणुकीत भाजपचा चेहरा ठरतात का यावर लक्ष लागून आहे.