नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महापालिकेची मनपा प्रभाग रचना आज घोषित झाली आहे. दरम्यान या प्रभाग रचनेकडे नाशिककरांसह राजकीय पुढारी, नेते, कार्यकर्ते आदींचे लक्ष लागून होते.
आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास महापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये मनपा प्रशासन उपयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी हि प्रभाग रचना जाहीर केली आहे. यामध्ये नाशिक महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी (सातपूर, पंचवटी, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, सिडको, नाशिकरोड) प्रभाग रचना उपलब्ध करण्यात आली आहे.
इथे पहा प्रभागनिहाय माहिती :
https://nmc.gov.in/home/getfrontpage/184/133/M#tabs|History:tab2
दरम्यान आरक्षणाशिवाय हि प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून यामध्ये प्रभागनिहाय नकाशे, त्यातला प्रभागातील समाविष्ट होणारा परिसर आदींचा उहापोह आराखड्यात करण्यात आला आहे. या प्रभाग रचना जाहीर झाल्यांनतर एक -प्रकारे मनपा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाल्याचे बोलले जात आहे.
नाशिक महापालिकेत सद्यस्थितिला १२२ नगरसेवक आहेत. मात्र नुकतंच प्रस्तावांनुसार आता नाशिक महानगर पालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली आहे. या १२२ मध्ये आणखी ११ प्रभाग वाढले असून नगरसेवक संख्या १३३ करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या यंदाच्या निवडणुकीत पूर्वीच्या चार सदस्यीय प्रभाग रचना बदलण्यात आली असून आता तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.