गोदावरी नदी पात्रात कपडे धुणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून दंड..

चैतन्य गायकवाड |

नाशिक: नाशिक शहरात (Nashik city) स्वच्छ्ता रहावी त्याचबरोबर आपली गोदामाई स्वच्छ सुंदर रहावी, यासाठी नाशिक महानगरपालिकेच्यावतीने (Nashik Municipal Corporation) विशेष पावले उचलली जात आहे. त्याच अनुषंगाने आपली गोदामाई स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून त्यासाठी काळजी घेणे गरजेचे असल्याचे देखील महानगरपालिका (Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक (Commissioner/ Administrator) रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी म्हटले आहे.

त्यातच आता महापालिकेकडून गोदावरी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी कडक पाऊले उचलली जात आहे. आज गोदावरी नदी पात्रात कपडे धुतांना आढळलेल्या नागरिकांवर महापालिकेच्या अधिकारी (officers) आणि कर्मचारी यांच्याकडून दंड (penalty) ठोठावण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल दहा हजार रुपयांचा (Ten Thousand Rupees) दंड आकारण्यात आला आहे.

गोदावरी नदी (Godavari River) प्रदूषण मुक्तीसाठी अनेक संघटना लढत आहेत. गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय सातत्याने गाजत असतो. गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या गटारी यांमुळे नदीचे जास्त प्रमाणात प्रदूषण होते. तसेच थेट नदी पात्रात उतरून कपडे धुण्यानेही प्रदूषणात भर पडते. या नागरिकांना अनेक वेळा समज देऊनही ते ऐकत नाही. त्यामुळे महापालिकेने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. याच मोहिमेच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नदी पात्रात कपडे धुणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बुधवारी (दि. १) गोदावरी नदी पात्राची पाहणी केली. लेंडी नाल्यापासून ते घारपुरे घाटापर्यंत, तसेच अहिल्यादेवी होळकर पूल ते जलालपूर, गोवर्धन महानगरपालिका हद्दीपर्यंत बोटीने, वाहनाद्वारे तसेच काही ठिकाणी पायी पाहणी केली. गोदावरी नदी पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी सांडपाण्याच्या तब्बल ५० गटारी सोडण्यात अलायचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यांनी हे सर्व सांडपाणी पुढील सहा महिन्यांमध्ये महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कनेक्शनला (connection) जोडण्याचे आदेश दिले. तसेच गंगापूर (Gangapur) मलजल शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी तसेच औद्योगिक कामांसाठी आणि उद्यानांमधील झाडांकरिता पुरवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.