नाशिक हादरले..! युवतीवर आधी लैंगिक अत्याचार आणि मग खून

नाशिक : इगतपुरी तालुक्यात अडसरे येथे एका अज्ञात युवतीचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. युवतीवर लैंगिक अत्याचार करून त्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

संशयित आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या घटनेने केवळ घोटी तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी घोटी पोलिसांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसमोर घटनेचा तपास लावण्याचे लक्ष उभे ठाकले आहे.

१६ फेब्रुवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात असलेल्या अडसर या गावातून एका २७ वर्ष युवतीचे प्रेत आढळून आले होते. दरम्यान या युवतीवर अत्याचार करून धारदार शस्त्रान भोकसून तिचा खून केल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील शेतात एका भाताच्या गंजी जवळ या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले या घटनेचा तपास केल्यानंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र आता धक्कादायक बाबत समोर येत आहे. तिच्यावर अत्याचार करून खून केल्याची घटना घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान तिच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून घोटी पोलिसात अज्ञात संशयित व्यक्ती विरोधात भारतीय दंडविधायक कलम ३०२, ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. या गंभीर घटनेच्या तपासासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा घोटी पोलिसांचे पथक संशयिताच्या मागावर आहेत. घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक निरीक्षक श्रद्धा गंधास, सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे, पोलीस हवलदार राऊत, सुहास गोसावी, बस्ते आदी पुढील तपास करत आहेत.