नाशिककरांनो सोमवारी शहरातील ‘हा’ मार्ग राहणार बंद

Edited By: Pavan Yeole
नाशिक: शहरातील वाहतूक मार्ग तिसऱ्या श्रावण सोमवारी निमित्ताने काही बदल करण्यात आले आहे. नाशिक शहरातून तसेच जिल्हाभरातून त्रंबकेश्वर येथे जाण्यासाठी शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे येत असल्यामुळे सीबीएस परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने
त्याचे परिणाम वाहतुकीच्या कोंडीवर निर्माण होत असल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये , तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यामुळे सीबीएस चौक शरणपूर रोड टिळकवाडी चौफुली पर्यंत जाणाऱ्या रोडवर एसटी बसेस व शहर वाहतुकीच्या बसेस वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.



त्याचप्रमाणे सीबीएस चौकातून टिळकवाडी सिग्नल कडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी सीबीएस चौकातून मोडक सिग्नल हॉटेल राजदूत मार्गे किंवा सीबीएस सिग्नल येतो मेहर सिग्नल अशोक स्तंभ मार्गे गंगापूर रोड चालू ठेवण्यात आला आहे .तसेच शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस चौकाकडे एसटी बसेस व शहर वाहतूक बसेस वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून. टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस कडे जाणारी वाहतूक ही टिळकवाडी सिग्नल जलतरण तलाव सिग्नल मोडक सिग्नल वरून सीबीएस कडे जातील किंवा टिळकवाडी सिग्नल वरून पंडित कॉलनी मार्गे गंगापूर रोडने अशोक स्तंभ मार्गे पुढे इतरत्र वाहनांसाठी असणार आहे .



त्याचप्रमाणे इतर वाहनांसाठी बंद असणारे रस्ते हे अत्यंत आवश्यक असलेलेया वाहनांकरिता चालू असणार आहे जसे , रुग्णवाहिका शववाहिका अग्निशामन दलाची वाहने तसेच पोलीस वाहनांकरिता चालू असणारअसल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. या वाहतूक मार्गाबाबत पोलिस आयुक्तालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.


दोन वर्षानंतर होणार तिसऱ्या श्रावण सोमवारी अधिक गर्दी
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी परिक्रमेसाठी येत असल्याने शहरातून त्रंबकेश्वर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोठी गर्दी होत असते परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षानंतर त्रंबकेश्वर ची फेरी अर्थात ब्रह्मगिरी परिक्रमा चालू असल्याने अधिक गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.