नाशिककर पाणी जपून वापरा शहराचा पाणी पुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद.

नाशिक:- राज्यात महिना भरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने शेतातील पिके पाण्याविना जाळून खाक झाली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागामधील धरणात गेल्यावर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात पुन्हा एकदा कोरडा दुष्काळ पडतो की काय असे वाटत आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर (GANGAPUR DAM NASHIK)आणि मुकणे (MUKANE DAM) धरणातील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीच्या कामामुळे येत्या शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

गंगापूर धरण तसेच मुकणे धरणावर असलेले मुकणे रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरणाच्या सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे तसेच ते ३३ केव्ही क्षमतेच्या
उपकरणाची तपासणी केल्या जाणार आहे. गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग(PUMPING STATION WORK ) स्टेशन येथील मीटरिंग क्युबिकल चे नवीन आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक आहे.

यासाठी महावितरण कंपनीकडील वीजपुरवठा शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान बंद ठेवावा लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहर नाशिक शहरातील पाणीपुरवठा होणार नाही.

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बहुतांश भागात पावसा अभावी काढणीस आलेली मका, बाजरी, ज्वारी या सारखी पिके पण्याविना जळून चालली आहे. शनिवारी नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद आसल्यामुळे नाशिक करांना पाणी संकटाला समोर जाव लागणार आहे. रविवारी सकाळचा पानी पुरवठा कमी दाबाणे पाणीपुरवठा सुरू राहणार आसल्याचे नाशिक महापालिकेकडून(NASHIK MAHANAGARPALIKA ) सांगण्यात आले आहे.