निवडणूक आयोगात उद्या राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी

मुंबई:- निवडणूक आयोगाकडून उद्या दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी प्रकरणावर सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र झाल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगात उद्या दुपारी ३ वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. निवडून चिन्हावरून वाद हा काही महाराष्ट्रासाठी नवा नाही.

ऑगस्ट २०२२ मध्ये शिवसेनेत दोन गट विभागले गेले. त्या पक्षाचा चिन्हावरून तो वाद संपतो ना संपतो तेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही पुन्हा दोन गट विभागल्याच पहायला मिळाल आहे. उद्यापासून आजून एक वेगळी लढाई सुरू होणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी च्या निवडणूक चिन्हबाबत पहिली सुनावणी आहे. शरद पवार गटाकडून या संबंधातली तयारी केली आहे. दिल्ली च्या कॉन्स्त्रीबुशन क्लब मध्ये विस्तारित कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली आहे.जर निवडणूक चिन्ह गोठवल गेलं तर आपल्या विरोधात विपरीत काही निर्णय आला तर पुढची रणनीती काय असेल हा या बैठकीचा अजेंडा असणार आहे.

शरद पवार गटाकडून आठ ते नऊ हजार कागदपत्र, शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. आणि शरद पवार गटाचा दावा असा आहे की, अजित पवार गटापेक्षा ही कागदपत्रांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाकडन दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रात काही दोष सुद्धा आहे असा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. तो दोष निवडून आयोगाला दाखवणार आहेत. काही मृत व्यक्तीच्या नावे शपथपत्र दाखल केली गेली आहेत. सरकारी कर्मचारी याचेही शपथपत्र दाखल केले आहेत असा दावा शरद पवार गटाकडन केला जात आहे. उद्या दुपारी ही सुनावणी होणार आहे. आता या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.