‘औरंगाबाद नव्हे छ. संभाजीनगरच’, नाशकात राष्ट्रवादीकडून लावण्यात आले फलक

नाशिक : औरंगाबादच्या नमंतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे नाशिक मधील औरंगाबाद नाक्यावर छत्रपती संभाजी नगर असे फलक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लावण्यात आले. नामकरण होऊन बराच कालावधी उलटला तरी देखील नाशिक मधील रस्त्यावर दिशा फलकाचे नाव बदल न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे फलक लावले असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.

शासनाच्या वतीने महाराष्ट्राची एक जुनी मागणी मान्य झाली आहे. औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे अशी जी मागणी होती, त्यानुसार संभाजीनगरचे नामकरण झाले आहे, मात्र नाशिक मधून औरंगाबादकडे म्हणजेच संभाजीनगर कडे जाणारा जो रस्ता आहे, त्याला अजूनही औरंगाबाद रोड म्हटलं जातं. दरम्यान त्याला सुद्धा छत्रपती संभाजीनगर रोड म्हणावं अशी प्रकारची मागणी अंबादास खैरे आणि कार्यकर्त्यांनी केली होती. अशात या रस्त्याचा संभाजीनगर रोड असा उल्लेख व्हावा आणि आराध्य दैवत संभाजी महाराज आहेत, त्यांचा सन्मान यिनिमित्ताने करावा अशी भावना फलक लावण्या मागची आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मांडले आहे.

आता चोहीकडे छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहराचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आल्यानंतर आता खऱ्या अर्थानं सगळीकडे छत्रपती संभाजी नगर होताना दिसून येत आहे. याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगर पालिकेपासून ते आता नाशिकच्या रोडपर्यंत नाव बदलण्यास सुरुवात झाली आहे. शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी मात्र अनेक ठिकाणी इतर जिल्ह्यांत रोड आणि चौकांना औरंगाबाद नावाचे फलक लावलेले दिसून येत आहे. नाशिकमध्ये देखील ‘औरंगाबाद रोड’ नावाचे फलक तसेच होते. दरम्यान आता नाशिक मधील औरंगाबाद नाक्यावर छत्रपती संभाजी नगर असे फलक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लावण्यात आले आहे. नामकरण होऊन बराच कालावधी उलटला तरी देखील नाशिक मधील रस्त्यावर दिशा फलकाचे नाव बदल न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे फलक लावले असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याचा हा मुद्दा अनेक दिवसांपासून सुरु होता. दरम्यान आता या शहरांचे नावे बदलण्यास केंद्र सरकारने देखील हिरवा कंदील दिला. अशात औरंगाबाद शहराचंच नव्हे तर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने यासंबंधीचं राजपत्र जारी करण्यात आले आहे.