‘या’ जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांचा बंद कायम, कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

नाशिक:- मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांच्या अनेकदा पत्रव्यवहार करूनही मागण्या मान्य न झाल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने बुधवार पासून कांदा लिलाव बंद ठेवला आहे. (close market commitee)सलग दोन दिवसांपासून बंद पुकरल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बजार समित्यां मध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारसमितीतील कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर महत्वपूर्ण बैठक घेण्यासाठी २६ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे(cabinet meeting). त्यामुळे हा बंद मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

२६ सप्टेंबर ला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक घेऊ आशा प्रकारचे लेखी पत्रही सरकारच्या वतीने व्यापारी असोसिएशनला देण्यात आले आहे. तरीही व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले आहेत.(close oinio market in nashik district ) त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी पिकांचे लिलाव बंद ठेवले आहेत अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांदा प्रश्नांवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती प्रतिनिधी, नाशिक जिल्हा उपनिबंधक यांसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील व्यापारी सध्या विविध प्रकारचे कारण देऊन लिलाव बंद ठेवत आहे त्यामुळे परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पुकारला असला तरीही नाफेडची कांदा खरेदी बंद राहणार नाही ती सुरूच राहणार असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार(abdul sattar)यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणाऱ्या लासलगाव कृषिउत्पन्न बाजार(lasalgav market comeeti )समितीत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस न आणल्याने गरुवारी शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले