लासलगाव रेल्वे अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक : लासलगाव रेल्वे अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. आज सकाळी लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात झाला आहे. लासलगाव रेल्वे स्थानकावर ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरच्या धडकेत चार गॅंगमनचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.

हा अपघात कसा झाला या संपूर्ण प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे माध्यमांशी बोलताना भारती पवार यांनी सांगितले आहे. इंजिन चालकाला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणार असल्याचे आश्वासन देखील केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या वतीने मदत केंद्रीय दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम चालू असताना दुर्घटना झाली होती आणि यात ४ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेने सहकारी कर्मचारी अत्यंत संतप्त झाले आहेत. परिणामी लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरच्या धडकेत चार गॅंगमनचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सहकारी कर्मचारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे यावेळी मनमाड -मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही रोखून धरली होती. रेल्वे पोलिसांच्या विनंतीनंतर रेल रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असून या रेल रोको आंदोलनामुळे गोदावरी एक्सप्रेस २० मिनिटांनी उशिरा मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

‘ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरचा रूट ठरलेला असतो मात्र गॅंगमनला कळले नाही हे चौकशी करण्यासारखे आहे. त्या दृष्टीकोनातून काही चुका झाल्या असतील त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी केली जाईल. झाले ते अत्यंत दुर्भाग्य आहे. अपघातात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या परिवारांना आर्थिक मदत मिळेल.’ अशी माहिती भारती पवार यांनी दिले आहे.

रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावर काम करत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना चिरडलं. या भीषण दुर्घटनेत कर्मचारी जागेवरच ठार झाले. आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. कर्मचाऱ्यांना रेल्वेने चिरडले, त्यामुळे सहकारी कर्मचारी संतप्त झाले. अशात चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले. या घटनेमुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते आणि त्यांनी रेल रोको आंदोलनाला सुरुवात केली होती.

रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या दोन डब्यांची रेल्वे टॉवर ही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सहा वाजता उभी होती. ही टॉवर गाडी लासलगावहून पुन्हा उगावच्या दिशेने काम करण्यासाठी जायचं होतं. या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकमन कामासाठी हजर होते. त्यांचं काम सुरू होतं. मात्र अचानकच या टॉवर गाडीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही लक्षात येण्याच्या आतच त्यांना चिरडले. यात चौघे कर्मचारी जागीच ठार झाले. त्यामुळे आंदोलन सहकारी कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. रेल्वे पोलिसांच्या विनंतीनंतर रेल रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले होते. दरम्यान हा अपघात कसा झाला या प्रकरणी उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी आता होणार आहे. त्यामुळे संपूर्ण अपघाताची माहिती लवकरच समोर यील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.