नाशकात अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन

नाशिक : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे हे ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्ष असून आज या संस्थेचा वर्धापन दिन साजरा झाला. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज नाशिक शहरातून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व करवीर पीठ जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांनी केले. या बाईक रॅलीची सुरुवात शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून होऊन, अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो बांधव सहभागी होते.

अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे २०२१ – २२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून संस्थेचा वर्धापन दिन २४ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी असतो. तर या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २१ ते २५ डिसेंबर २०२२ या दरम्यान पंच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक मध्ये अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या महाराष्ट्रातील सगळ्या शाखा सलग्न संस्था आणि सर्व ब्राह्मण समाज एकत्र येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यमग्न मान्यवरांचा उचित सन्मान आपापल्या क्षेत्रात विशेष उंची गाठलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते करण्याचे या कार्यक्रमात योजले आहे. एकूणच या निमित्ताने ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज सत्कारमूर्ती आणि मान्यवर यांची मांदियाळी अनुभवता येत आहे.

याशिवाय शिक्षण, औद्योगिक, समाजकार्य, संगीत, अभिनय, साहित्य, प्रशासन, वैद्यकीय, वैदिक, अध्यात्मिक, धार्मिक, क्रीडा, अर्थशास्त्र, ज्योतिष या आणि अशा विविध विषयांमध्ये मानाचे स्थान प्राप्त करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे या कार्यक्रमाचा मानस आहे. या कार्यक्रमाचे खास खास वैशिष्ट्य म्हणजे दिनांक २१, २२ आणि 23 डिसेंबर या तीन दिवशी हरिभक्त परायण चारुदत्त आफळे यांचे कीर्तन होते. स्वामी विवेकानंद, आजचा युवक, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या अनेक विषयांवर कीर्तन करण्यात आले.

शनिवार म्हणजेच आज (दिनांक २४) नाशिक शहरातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत पारंपारिक वेशातील महिला पुरुष आणि युवक सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व करवीर पीठ जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांनी केले. या बाईक रॅलीची सुरुवात शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून होऊन, अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो बांधव सहभागी होते.