शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यालेखकाचं जागृत करणं लोकांना रुचत नाही - जावेद अख्तर

लेखकाचं जागृत करणं लोकांना रुचत नाही – जावेद अख्तर

नाशिक | प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर म्हणाले की, मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आणते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले.

यावेळी ते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे.

पुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.

जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख,
जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख…!
इतनी अंधेरी न थी रात पहले लिख- जावेद अख्तर असे म्हणत लेखकांना निर्भीडपणे लिहीण्यासाठी साद घातली.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप