साक्री शिर्डी महामार्गावर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून ठाकरे गटाच आंदोलन

सटाणा :- मागील काही काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई – गोवा महामार्गवर (MUMBAI- GOVA HIGHWAY )आंदोलन करण्यात आले होते. कोट्यावधी रुपये खर्च करूनही या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेने पाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटही महामार्गाच्या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सटाण्यात साक्री – शिर्डी महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाकडून(SHIVSENA THAKARE GROUP ) खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री – शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर तीन ते चार फूट खोल पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर वारंवार अपघात होऊन वाहनांचे नुकसान होते. या महामार्गा संबंधित राज्य शासनास अनेक वेळा निवेदने देऊनही कुठल्याही प्रकारचे रस्त्याची डागडुजी न केल्याने मंगळवारी ठाकरे गटाकडून या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी तात्पुरती मलम पट्टी करून डागडुजी केली जात होती. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक महामार्गाची दुरावस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामुळे संबंधीत विभागाचे महामार्गांकडे दुर्लक्ष आहे असा प्रश्न आता साक्री शहरवासीयां कडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावरून गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.

तसेच या महामार्गावरून महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी नागरिकांची ही मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. खड्ड्या टाळण्याच्या नादामध्ये दररोज छोटे-मोठे अपघात घडत असतात त्यामुळे रात्रंदिवस सुरू असलेला महामार्ग सध्या अपघाताचे केंद्र(ACCIDENT CENTER ) ठरल्याचे रहिवाशी म्हणत आहे.

या महामार्गावरून अनेक छोट्या-मोठ्या वाहतुकीची वर्दळ असते शालेय विद्यार्थी पदचारी यामुळे हा महामार्ग नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे या महामार्गात छोटे-मोठे खड्डे असल्याने अपघाताचे सत्र सुरू आहे. थोड्याच कालावधी मध्ये हा महामार्ग मृत्यूचा सापळा चालला आहे.

त्यामुळे संतप्त होत महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाने अचानक जिल्हा संघटक लालचंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महामार्गावरील पुष्पांजली थिएटरवर पिंपळेश्वर नाका परिसरातील मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केले.