क्लाउड तज्ञ पियुष सोमानी यांच्या पुस्तकांचे नाशिकमध्ये प्रकाशन

नाशिक : लिव्हिंग इन हार्मनी विथ द सन (living in harmony with the son) आणि आंत्रप्रेन्युअर विथ द फायर विदिन (entrepreneur with the fire within) या पुस्तकांचे नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले. शहरात शुक्रवारी (२१ ऑक्टोबर २०२२) प्रसिद्ध उद्योजक आणि क्लाऊड तज्ञ इंडस्ट्री आणि नाशिक शहरातील एक विश्वासार्ह नाव पियुष सोमानी यांनी त्यांचा उद्योजक आणि आरोग्य परिवर्तनाचा प्रवास सांगणारी दोन पुस्तकं प्रकाशित केले. दरम्यान एक लेखक म्हणून पदार्पण करताना नाशिक येथे लिविंग इन हार्मनी विथ सन आणि आंतर फायर विधी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पियुष सोमानी क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डेटा सेंटर सेवा कंपनी इ एस डी एस सॉफ्टवेअर सोल्युशन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. दरम्यान त्यांनी या दोन पुस्तकातून उद्योजक आणि आरोग्य परिवर्तनाचा त्यांचा प्रवास सांगणारी पुस्तक प्रकाशित केली आहे.

या कार्यक्रमासाठी युवराज छत्रपती संभाजी राजे, रिषभ इन्स्टुमेंट्सचे नरेंद्र गोलिया, सह्याद्री ऍग्रोचे संचालक विलास शिंदे, सीआयआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक स्वामी श्री कंठानंद आणि डॉक्टर जयंत चोपडे आदी उपस्थित होते. तसेच, या कार्यक्रमात माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी व्हिडिओ संदेशद्वारे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. “पियुष हे गेल्या अनेक वर्षांपासून माझे चांगले मित्र आहेत, ते एक साधा माणूस आणि जीवनाकडे साध्या वृत्तीने बघणारी व्यक्ती आहे. पियुष आणि कोमल सोमाणी दोघेही चांगले लोक आहे. पियुषने या पुस्तकांमध्ये त्यांचे वास्तविक जीवनातील अनुभव मांडले आहेत. ते त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून इच्छिणाऱ्या आणि जीवनात मोठे काम करू इच्छिणाऱ्या सर्व तरुण व्यवसायिकांसाठी खूप खूप उपयुक्त ठरतील अशी मला खात्री आहे, ‘आंत्रप्रेन्युअर विथ द फायर विदिन’ हे पुस्तक अनेक तरुणांना प्रेरणा देईल अशी देखील मला खात्री आहे. त्यासाठी मी पियुष आणि कोमल ला या प्रकाशनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो,’ अशा शुभेच्छा क्रिकेटपटू माझी भारतीय क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी यावेळी दिल्या.

या कार्यक्रमात बोलताना पियुष सोमानी यांनी हे पुस्तकं लिहिण्याचा प्रवास सांगितला आहे. ‘ही पुस्तके लिहिण्याचा प्रवास खूप खास आहे. ही दोन्ही पुस्तकं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो जे या अद्भुत प्रवासाचा भाग बनले आहे आणि या पुस्तक प्रकाशित करण्यास सर्वतोपरी मदत केली आहे. मी तरुण उद्योजक आणि व्यावसायिकांसह सर्वांना प्रोत्साहित करतो की त्यांनी वेळ काढून ही पुस्तके वाचावीत, समजून घ्यावीत, त्यातून शिकावं आणि तुम्हाला जीवनात उपयोगी पडेल असं ज्ञान मिळवावं. जग क्षणाक्षणाला बदलत आहे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रथम आपलं मन निरोगी केलं पाहिजे,’ असा संदेश त्यांनी यावेळी दिलाय.