अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला शिक्षा

देवळा :अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला चार वर्षानंतर सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात असलेल्या देवळा तालुक्यातील लोहनेर कुंभारवाडा येथे चार वर्षांपूर्वी शाळेच दप्तर शिवण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या 61 वर्षीय रोडू भागा वाघ या आरोपी वृद्धाला न्यायालयाने दोषी ठरवले असून. तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गावातीलच अकरा वर्ष पीडित मुलगी ऑक्टोंबर 2018 रोजी आरोपी रोडू वाघ याच्याकडे शाळेचे फाटलेले दप्तर शिवण्यासाठी गेली होती त्यावेळी रोडू याने तिला चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात नेत अत्याचाराचा प्रयत्न केला तसेच धमकी देखील दिली होती याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची व पडीत जागी त पुरून देण्याची धमकी पीडित अल्पवयीन मुलीला दिली होती. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात रोडू वाघ याच्या विरोधात बलात्कारासह फोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.