शिवसेनेचे दोन मेळावे; रामदास कदमांनी व्यक्त केली खंत

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना म्हणजे आम्हीच म्हणत त्यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसेच मूळ शिवसेना म्हणजेच ठाकरे गट हा देखील आपला पारंपारिक दासरा मेळावा शिवाजीपार्कवर घेत आहे. राज्यात होणाऱ्या या दोन्ही मेळाव्यामुळे मी समाधानी नाही असे रामदास कदम म्हणाले आहेत. रामदास कदम यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मात्र तरीही रामदास कदम असे बोलल्याने चर्चाना उधान आले आहे.


रामदास कदम म्हणाले,

“दोन ठिकाणी वेगळा मेळावा होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे आपण समाधानी नाही. पक्ष उभा केला आहे. केसेस घेतल्या आहेत. सगळे आपण भोगल आहे. त्यामुळे दुःख होत आहे, शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. त्याचे आपल्याला दुःख झाले, असे रामदास कदम यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना घेरल

दोन मिळावे शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत नाही. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक चातकासारखे वाट बघत होते. ते विचार उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. विचार बाळासाहेब यांचेच. बाकी कुणाचे नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे फक्त अफजलखानाचा विषय आणि भाजप टार्गेट असेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

पवारांचं कौतुक

रामदास कदमांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केले आहे. ते म्हणाले, शरद पवारांसारखी व्यक्ती वयाच्या 82 व्या वर्षी संपूर्ण कोकणात फिरते. या कोकणात शिवसेना मोठी केली. मात्र उद्धव ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.