बच्चू कडूंच्या मेळाव्यानंतर रवी राणा म्हणाले, आता…

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पडदा टाकला तरी आज बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रहारचा मेळावा घेत शक्तिप्रदर्शन करत विरोधकांना तसेच त्यांच्या नादी लागणाऱ्यांना खणखणीत इशारा दिला. तसेच रवी राणा यांना देखील पहिली चूक म्हणून माफी दिली तसेच त्यांच्यासोबतचा वाद संपल्याचे जाहीर केले. यावर आता आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रवी राणा म्हणाले,

“आता शेतकरी, सर्वसामान्य यांचे प्रश्न, बेरोजगारी संबधी प्रश्न ते पुढे आणायचे आहेत म्हणून आता हा वाद विवाद राहिला नाही संपला आहे. आता कोणताही वाद नाही आम्ही लोकांसाठी काम करत राहणार बच्चू कडू आणि माझ्यातला वाद आता संपला आहे.” अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.

आगामी निवडणुकीत विरोधात उमेदवार उभे केले जाणार आहेत यावर बोलतांना रवी राणा यांनी म्हटले की, माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले तरी जनता ज्यांच्या सोबत असते, ज्यांच्यावर आशीर्वाद असतात तेच जिंकून येतात. मी मागच्या वेळी 20 ते 22 हजार मतांनी विजयी झालो होतो, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

मी सर्वसामान्यांना मदत करतो, अपंगाना मदत करतो, माजी सैनिकांना मदत करतो. माझा पगार देखील माजी सैनिकांसाठी घर बांधून देण्यासाठी खर्च करतो. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी काम करतो. म्हणून जनता माझ्यासोबत आहे, असंही रवी राणा यांनी म्हटले.

बच्चू कडू म्हणतात

“रवी राणा यांनी माघार घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी देखील अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर वादावर पडता टाकला. मी आमदार रवी राणा यांना माफ केलं. हा विषय संपला आहे. माझ्याकडूनही चुकून काही चुकीचे शब्द निघाले असतील, तर तेही शब्द मागे घेतो”, असे बच्चू कडू यांनी म्हटले.