Indian Idol season 13: अयोध्येतील ऋषी सिंग यांनी ‘इंडियन आयडॉलच्या 13 व्या सीझन चे विजेतेपद जिंकले

‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol season 13) चे आतापर्यंत 13 सीझन झाले आहेत. नुकत्याच झालेल्या सीझन 13 च्या अंतिम फेरीत ऋषी सिंग विजेता ठरला आहे.

Indian Idol season 13: टीव्हीचा लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 13’ Indian Idol 13 चा विजेता ठरला आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येतून आलेल्या ऋषी सिंगने 13व्या हंगामाची ट्रॉफी जिंकली आहे. त्याने अंतिम फेरीत सोनाक्षी कार, शिवम सिंग, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती आणि देवोस्मिता रॉय यांना मागे टाकत हा ट्रॉफी जिंकला आहे.

ऋषी सिंगने ऑडिशन राऊंडमधून एकाहून एक गाणे सादर करून जज आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शोच्या सुरुवातीपासूनच ऋषी खूप लोकप्रिय झाले होते. त्यामुळे तो शो जिंकेल असा दावा सोशल मीडियावर आधीच केला जात होता. ऋषी सिंगचे चाहते फक्त इंडियन आयडॉल पाहणारेच नाहीत तर क्रिकेटपटू विराट कोहलीचेही आहेत.