पडळकरांवर रुपाली पाटील यांची जहरी टीका म्हणाल्या राजकीय विकृत..

नाशिक | भारतीय जनता पार्टीचे (Bjp) नेते गोपीचंद पडळकर Gopichnad Padlkar ) आणि राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांचं राजकीय समीकरण महाराष्ट्राला चांगलेच माहित आहे .आमदार पडळकर हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसत असतात .आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर खालच्या पातळीवरची टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी (Ncp) तरी कुठं शांत बसणार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील पडळकरांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील (Rupali Patil )यांनी पाडळकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देत गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारलं असताना रुपाली पाटील म्हणाल्या की, “गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आमदार आहेत. अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल. ते सतत शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर तोंडसुख घेत असतात. भाजपा नेते स्वत:ला सुसंस्कृत समजतात पण त्याच लोकांच्या या भावना आहेत. केवळ ते बोलू शकत नाहीत, म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात,” अश्या शब्दात टीका केली आहे.

“गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे असल्याने भाजपाने त्यांना आमदार बनवलं आहे. आपल्या मालकाला खूश करण्यासाठी ते शरद पवारांवर नेहमी टीका करत असतात.असे देखील रुपाली पाटील म्हणाल्या भाजपाने महादेव जाणकरांचा देखील उपयोग करून घेतला, तेही पडळकरांप्रमाणे शरद पवारांवर टीका करत होते. पण ते वेळीच शहाणे झाले आणि त्यातून बाहेर पडले. पण भाजपाला सतत शरद पवारांना लक्ष्य करायचं असतं.”“पवारांवर सतत शंका निर्माण करणे, प्रश्न उपस्थित करणे, राजकारणाची पातळी खालच्या दर्जाला आणणे, ह्या साठी भाजपाकडून गोपीचंद पडळकरांचा वापर केला जात आहे.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आमदार गोपीचंद पडळकर सुरवातीपासूनच राष्ट्रवादीला टार्गेट करत आले आहेत. गोपीचंद पाडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि शरद पवारांवर टीका करायला एकही संधी सोडली नाही मग ते अजित पवार असो अथवा अमोल मिटकरी यांच्यावर कायमच टीका केली आहे. मग यात राष्ट्रवादीने हि वेळोवेळी पडळकरांवर टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी हे समीकरण चांगलंच माहिती आहे.