दुःखद बातमी! भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन..

पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे आज गुरुवार (दि. २२) दुपारी निधन झाले आहे. त्यांची अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज सुरू होती. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली असून पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे निधनाची बातमी दुःखद असून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

आमदार मुक्ता टिळक या मागील काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत होत्या. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मुक्ता टिळक या 57 वर्षाच्या होत्या.

सत्तांतरापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी मुक्ता टिळक यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मे महिन्यात झालेल्या या मतदानाला त्या विशेष वाहनाने पुण्यातून मुंबईत आल्या होत्या. व्हिल चेअरवर बसूनच त्यांनी मतदान केलं होते.  १० जून २०२२ ला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले होत. त्यावेळी रुग्णालयात दाखल असतानाही आमदार मुक्ता टिळ आणि आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपचे दोन्ही आमदार मतदानासाठी मुंबईत पोहोचले होते. मुक्ता टिळक या स्ट्रेचरवरून विधानभवनात मतदानासाठी आल्या होत्या तर जगताप हे अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले होते. एक एक मत आमच्यासाठी मौल्यवान असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी त्यांचा विजय हा मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता.

मुक्ता टिळक यांनी 2002 साली पहिली निवडणूक लढवली होती. 2002 पासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या महापालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचा मोठा गौरवही करण्यात आला होता. पुण्याच्या राजकारणात आल्यापासून त्यांनी महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले होते.

पुण्याच्या महापालिकेमध्ये त्यांची कामगिरी श्रेष्ठ ठरल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कामामुळे आमदारकीवर आपले नाव कोरले होते.