नाशिक जिल्ह्यात नवा विश्वविक्रम रचत सावित्रीबाई फुलेंना वंदन

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या रांगोळीच्या माध्यमातून नवा विश्वविक्रम रचला गेला आहे. आज ३ जानेवारी, सावित्रबाई फुले जयंती निमित्त नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित, जनता विद्यालय मुंजवाड या विद्यालयात तब्बल ११ हजार स्क्वेअर फूट एवढी भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. यासाठी २०५० किलो इतक्या रांगोळीचा वापर केला गेला.

कला शिक्षक अहिरे दिगंबर आणि शाळेचे ३० विद्यार्थी, ८ शिक्षक, शिक्षिका यात सहभागी झाले होते. एकूण ३१ तासाच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाल्याचे. मुख्याध्यापक जाधव यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी आणि समाजसुधारक होत्या. शिक्षण आणि साक्षरतेच्या क्षेत्रात महिलांच्या उत्थानासाठी स्त्री शिक्षणाची प्रगती करण्याचा क्रांतिकारी अग्नि त्यांच्याकडे होता. महिलांच्या शिक्षणाच्या संघर्षात ती आपल्या पतीसोबत सहयोगी होती. क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांनी आगीप्रमाणे सुरुवात केल्याने या पिढीतील सर्व महिलांसाठी त्यांची जयंती हा महत्त्वाचा दिवस आहे. या महत्त्वाच्या दिवशी सावित्रीबाई फुले प्रतिमेचा रांगोळीच्या माध्यमातून नवा विश्वविक्रम रचला गेला आहे.

थोडक्यात

-सावित्रीबाई फुले प्रतिमेचा रांगोळीच्या माध्यमातून विश्वविक्रम

-सावित्रबाई फुले जयंती निमित्त नाशिक जिल्ह्यात सावित्रीबाई फुलेंची १ हजार स्क्वेअर फूट एवढी भव्य रांगोळी

-महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित, जनता विद्यालय मुंजवाड या विद्यालयाच्या वतीने रांगोळी

-२०५० किलो इतक्या रांगोळीचा वापर

-कला शिक्षक अहिरे दिगंबर, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका यांचे परिश्रम

-३१ तासाच्या अथक परिश्रमानंतर रचला विक्रम

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पावणे दोनशे वर्षांपुर्वी जे कार्य केले, ते काळाच्याही पुढे होते. या दाम्पत्याने त्या काळात दाखवलेली हिंमत, घेतलेली भूमिका आणि त्यासाठी केलेला त्याग आजही कुणी करु शकत नाही. त्यासाठी या दोघाही महापुरुषांना मनापासून वंदन केलेच पाहीजे आणि जणू हेच वंदन सावित्रीबाई फुले यांना या भव्य रांगोळी द्वारे करण्यात आले आहे. सावित्रबाई फुले जयंती निमित्त नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित, जनता विद्यालयात तब्बल ११ हजार स्क्वेअर फूट एवढी भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

नाशिक सटाणा तालुक्यातील मुंजवाड हा विश्वविक्रम रचण्यात आला असून येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त (Savitribai Phule Jayanti) महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित, जनता विद्यालय मुंजवाड या विद्यालयात तब्बल 11 हजार स्क्वेअर फूट एवढी मोठी रांगोळी (Rangoli Of Savitribai Phule) साकारण्यात आली आहे.