व्यंग चित्रकार किरण मोरे आपल्या व्यंग चित्रातून शेतकरी बांधवांची व्यथा मांडणार

सटाणा: मोरेनगर येथील व्यंग चित्रकार किरण दादाजी मोरे आपल्या व्यंग चित्रातून शेतकरी बांधवांची व्यथा मांडणार आहेत.

बागलाण तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती करतो की आता खूप झाले रस्ता रोको आंदोलन/ उपोषण /रस्त्यावर येवुन निषेध करणे कांदा उत्पादक शेतकरी किती खर्च करतो हे सरकारला माहित असेल किंवा नाही.

त्यात गेल्या दोन वर्ष कोरोना मागच्या वर्षी उष्माघात चालू वर्षी अतिवृष्टी अवकाळी आपल्या हतबल तेचा फायदा घेवून व्यापारी वर्गाने सुरू केलेली लूट जास्त लिखाण करत नाही माय बाप हो पण आपण जो कांदा कष्टाने पिकवला आहे त्या साठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे त्यासाठी लागणारे भांडवल कुठून आणला हे आपल्यालाच माहीत आहे.

आपल्या कांद्याची व्यथा थेट दिल्ली मुंबई दरबारात पोहोच करण्यासाठी आपल्या तालुक्यातील शेतकरी व्यंग चित्रकार किरण दादाजी मोरे हे दिनांक 26/5/2023/ वार शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता सटाणा तहसील कार्यालय समोर आपल्या व्यंग चित्रातून शेतकरी बांधवांची व्यथा मांडणार आहेत.

किरण मोरे यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी यांना विनंती केली कि आपण एक दिवस म्हणजे आपला एक तास त्यांच्या एक दिवसाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यावे ही विनंती शेतकरी व्यंग चित्रकार किरण मोरे /शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड/प्रहार शेतकरी संघटना सटाणा /तालुका राहुल सोनवणे सोशल मीडिया प्रमुख प्रहार शेतकरी संघटना टीप सर्व शेतकरी भूमिपुत्र पत्रकार बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण च या बळीराजाला आता आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देवू शकता.