सात समुद्रापार ‘RRR’ ; अमेरिकेत पुन्हा रिलीज होणार चित्रपट

आर आर आर या भारतीय चित्रपटाने भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टी देखील गाजवली आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने तर अनेकांची मनं जिंकली आहे. राम चरण आणि ज्युनिअर एन.टी.आरचा (Ram Charan and Jr. N.T.R) एनर्जेटिक डान्स तर ‘सोने पे सुहागा’ म्हणावा. म्हणूनच तर या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतासाठी आणि भारतीय सिनेसृष्टी साठी आर आर आर चित्रपटाचे हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे.

दक्षिण भारतीय सिनेमे म्हणजे South Film Industry सध्या भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केट देखील गाजवत आहे. या सिनेम्यांनी आणि कलाकारांनी चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. पुष्पा, बाहुबली, के जी एफ, आर आर आर असे कितीतरी उदाहरणं या सिनेम्यांच्या जादूची साक्ष देतात. टशन आणि ॲक्शनने भरपूर असलेले सिनेमे चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. तसेच राज्य आर आर आरने देखील केले. केवळ भारतीयच नाही, तर अंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या चित्रपटाने धूम केली आहे.

अमेरीकेत २०० पेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘RRR’ चित्रपट

एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या पेक्षाही मोठी आणि भारतीय सिनेसृष्टीची मान अभिमानाने उंचावणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट ३ मार्च रोजी अमेरीकेतील २०० पेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स यांनी घेतला आहे. त्यांनी याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे.

वेरिएंस फिल्म्सने शेअर केले ट्वीट 

या ट्वीट मध्ये ते लिहितात ‘FINAL TRAILER Let the CelebRRRation begin! S.S. Rajamouli’s masterpiece #RRRMovie is roaring back to over 200 theaters nationwide starting March 3rd. Tickets and theater list here’..’आरआरआर फायनल ट्रेलर, सेलिब्रेशनला सुरुवात करुयात. एस. एस. राजामौली यांचा मास्टरपीस असलेला आरआरआर हा  3 मार्च रोजी चित्रपट 200 पेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तिकीट आणि थिएटर्सची लिस्ट पाहा.’ यानंतर त्यांनी नव्या ट्रेलर ची लिंक दिली आहे.

हा चित्रपट अमेरिकेत पुन्हा रिलीज होत असल्याने अमेरिकेतील नागरिकांना हा बघता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या चित्रपटाची यशस्वी वाटचाल पुढे सुरूच आहे.