शरद पवारांनी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचे टोचले कान!

काल शिवाजीपार्क आणि बीकेसी मैदानावर ठाकरे आणि शिंदे गटाचे दसरा मेळावे पार पडले. यात दोन्ही गटांनी एकमेकांनी हल्लाबोल केला असून पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. दोन्ही मेळावे गाजले असून त्याची एक नियोजनाने तर एक आवेशाने गाजला असून यावर अनेक राजकारण्यांनी प्रतिक्रिया दिली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणतात, “पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र संघर्षालाही मर्यादा ठेवली पाहिजे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरू आहे. ते दुर्देवी आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नये, ते राज्याच्या दृष्टीने चांगले होणार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही गटाचे कान टोचले आहे. आज पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना हा सल्ला दिला आहे.

राज्याच्या राजकारणाला आता नवीनच रंग चढणार असून आता शिवसेनेचा फैसला काही घटिकांवर असल्याचे म्हंटले जात आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली भूमिका मांडायला ७ ऑक्टोबर म्हणजेच उद्याची अंतिम तारीख दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता लवकरच शिवसेनेचा फैसला होणार आहे. तसेच दसरा मेळवा आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना महाराष्ट्र दौरा करणार आहेत. तसेच येत्या ९ तारखेला एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात शिवसेने जाहीर सभा घेणार आहे. त्यामुळे पुन्हा राजकारण तापणार हे नक्की आहे.